महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘महा-देवा’ फुटबॉल करार; ३० मुले–३० मुलींसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाची संधी

मुंबई (प्रतिनिधी):- महाराष्ट्रातील ग्रामीण व आदिवासी भागातील फुटबॉल प्रतिभेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने राबवलेल्या ‘महा-देवा’ फुटबॉल प्रतिभा विकास उपक्रमाला मोठी चालना मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यात या उपक्रमासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

यावेळी सुखराज नाहर यांनी व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF) ला एक कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले. ग्रामीण क्रीडा विकासासाठी ही मोठी मदत मानली जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलांमध्ये अफाट क्रीडा प्रतिभा आहे. ‘महा-देवा’ उपक्रमातून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळेल.”

कार्यक्रमाला क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील पांढरे, अभिनेता टायगर श्रॉफ, तसेच नाहर ग्रुपचे संस्थापक सुखराज नाहर आदी मान्यवर उपस्थित होते.

उपक्रमाची वैशिष्ट्ये

टायगर श्रॉफ पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर,
राज्यातील मुला–मुलीतील फुटबॉल प्रतिभा ओळखणे व विकसित करणे,
डब्लूआयएफएच्या स्काऊटिंग नेटवर्कद्वारे ३० मुलं आणि ३० मुलींची निवड,

निवडलेल्या खेळाडूंना
तांत्रिक प्रशिक्षण,शैक्षणिक मदत
आंतरराष्ट्रीय कॅम्प्स आणि एक्स्पोजर
हे सर्व उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

‘महा-देवा’ उपक्रमामुळे ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील खेळाडूंना प्रथमच अशा मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण व आंतरराष्ट्रीय पातळीवरील संधी मिळणार असल्याने राज्यातील फुटबॉल क्षेत्रात नवे पर्व सुरू होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!