राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत ‘जिजाऊ–सावित्रीच्या लेकीं’चा कर्तृत्ववान महिला म्हणून गौरव

राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत ‘जिजाऊ–सावित्रीच्या लेकीं’चा कर्तृत्ववान महिला म्हणून गौरव
सोलापूर (प्रतिनिधी):- राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने मराठा सेवा संघ, जिल्हा परिषद शाखेच्या वतीने ‘जिजाऊ–सावित्रीच्या लेकी’ या संकल्पनेतून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सोमवार, दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषद सोलापूर येथील यशवंत चव्हाण सभागृहात होणार आहे, अशी माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अविनाश गोडसे यांनी दिली.

या कार्यक्रमात जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलदीप जंगम यांच्या शुभहस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार असून, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक श्री. चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्र) श्रीमती स्मिता पाटील, तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती मिनाक्षी वाकडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या सन्मान सोहळ्यात मालती नंदकुमार कोहिणकर, उषा उत्तमराव जगताप, छाया महादेव पाटील, वनमाला महादेव भुजबळ, माया चंद्रहार जाधव, मंगला यशवंत मिरकले, कल्पना तानाजी वाकडे, सुदामती नागनाथ जगताप, प्रभावती गोविंद नवले, नंदाबाई शिवाजी हावळे, कलावती भरत धनशेट्टी, बायडाबाई सुभाष कवितके, सविता तानाजी कदम, वनिता विजय जमदाडे, चंद्रभागा भगवान पांढरे, कुसूम जनार्दन कुलकर्णी, लियाकत नैनुद्दीन शेख आणि सुनिता बापूराव राऊत या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा कर्तृत्ववान महिला म्हणून गौरव करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या प्रसंगी अनिल जगताप, सचिन साळुंखे, सूर्यकांत मोहिते, सुहास चेळेकर, आप्पासाहेब भोसले, सचिन चव्हाण, चेतन भोसले, विकास भांगे, रोहित घुले, रणजित गव्हाणे, संतोष शिंदे, अनिल पाटील, वासुदेव घाडगे, सुधाकर माने देशमुख, विशाल घोगरे, अभिजीत निचळ, संतोष सातपुते, भूषण काळे, उमेश खंडागळे, प्रकाश शेंडगे, मनोज साठे, गोपाल शिंदे, संजय पाटील, रविंद्र शेंडगे, महेंद्र माने, सुभाष तनमोर, शशि साळुंखे, विठ्ठल मलपे, हृषिकेश जाधव, जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमातून राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अभिवादन करत महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव व समाजात प्रेरणा निर्माण करण्याचा उद्देश साध्य होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.



