सोलापूर

दुष्काळाच्या झळांनी कटफळमधील शेती उद्ध्वस्त; पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली पिकांच्या नुकसानीची पाहणी

शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत घेतली नुकसानीची माहिती; पंचनामे व मदतीबाबत प्रशासनाला सूचना

दुष्काळाच्या झळांनी कटफळमधील शेती उद्ध्वस्त; पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली पिकांच्या नुकसानीची पाहणी

शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत घेतली नुकसानीची माहिती; पंचनामे व मदतीबाबत प्रशासनाला सूचना

कटफळ : सांगोला तालुक्यातील कटफळ परिसरात दुष्काळी परिस्थितीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या नुकसानीची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम झाला आहे. पाण्याअभावी पिके करपण्यास सुरुवात झाली असून, अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कटफळ येथे भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला.

पाहणीदरम्यान पालकमंत्री गोरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत कोणत्या पिकांचे किती नुकसान झाले, पावसाची स्थिती कशी आहे, पाण्याची उपलब्धता किती आहे, तसेच शेतीसाठी येणाऱ्या अडचणींबाबत माहिती घेतली. शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची माहिती पालकमंत्र्यांसमोर मांडली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा दिलासा मिळावा, यासाठी नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तत्परतेने काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

पाहणी दौऱ्यावेळी आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, माजी आमदार शहाजी पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार बाळूताई भागवत, तालुका कृषी अधिकारी दीपली जाधव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, योगेश कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असल्याने शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करणे आणि शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देणे याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!