सोलापूर

श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेतील विद्यार्थ्यांची ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुख्य हेड पोस्ट ऑफिसला भेट

श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेतील विद्यार्थ्यांची ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुख्य हेड पोस्ट ऑफिसला भेट

सोलापूर: इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेतील इयत्ता नववी स्काऊट व गाईड युनिट मधील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शिक्षकांनी “ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारतीस भेट”* या उपक्रमांतर्गत सोलापूर येथील मुख्य हेड पोस्ट ऑफिस येथे भेट दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना ब्रिटिशकालीन कलोनियन वास्तु शास्त्रानुसार* बांधण्यात आलेली मुख्य हेड पोस्ट ऑफिसच्या इमारतीची संकीर्ण माहिती देण्यात आली. सोलापूरात पोस्ट व टेलिग्राम ची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ब्रिटिशांना 1908 मध्ये या कलोनियन इमारतीची बांधणी केली .स्थानिक हवामानानुसार पोषक अशा असणाऱ्या इमारतीचे सौंदर्य व भव्य वास्तू पाहून विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मुख्य पोस्ट ऑफिस येथील विविध व्यवहारांची माहिती व्हावी व त्यांच्यात आर्थिक साक्षरता, संप्रेषण, दळणवळण, भारतीय पोस्ट खात्यातील बदल, गतिमानता, पारदर्शकपणा, सुकन्या योजना, दीनदयाल योजना, आरडी खाते बचत खाते साधे पोस्ट स्पीड पोस्ट अंतरदेशीय पोस्ट माहिती देण्यात आली. तसेच त्यांनी पैशांची बचत करून भविष्यात आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे म्हणून पोस्टातील विविध व्यवहारासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन लाभले.

याप्रसंगी तज्ञ मार्गदर्शक म्हणून सोलापूर भारतीय मुख्य.डाक विभागाचे वरिष्ठ पोस्ट मास्तर
श्री. सोमनाथ काळे* यांच्या नेतृत्वाखाली सीनियर क्लर्क श्री एस एस पवार श्री काशिनाथ माळी तसेच IPPB बँकेचे व्यवस्थापक श्री विनायक सर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय डाक विभागाचा इतिहास, बदल, गतिमानता,पारदर्शकपणा सुकन्या योजना, खाते उघडणे, आधार कार्ड योजना, लाडकी बहीण योजना, पाचवी ते नववी पर्यंत शिष्यवृत्ती योजना ,विविध खात्यांचे प्रकार विविध, प्रकारच्या ठेवी, विविध ठेव योजना, रखमा काढणे व जमा करणे यासाठी लागणाऱ्या विविध फॉर्म, विविध खात्या वर व ठेवीवर मिळणारे व्याज व सुविधा, भारतीय डाक विभागाचे बँक व एटीएम सुविधा इत्यादी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सोलापूर भारतीय मुख्य डाक विभागातील जीडीएस व शाळेतील माजी विद्यार्थिनी कु. राजनंदिनी पाटील व साजीद शेख यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी पोस्ट व्यवहारासंबंधी आपले प्रश्न विचारून शंकांचे समाधान करून घेतले.

संस्थेचे अध्यक्ष श्री विपिन ठोकळ उपाध्यक्ष श्री. सचिन ठोकळ,संचालिका सौ. शिल्पा ठोकळ, सचिव श्री. भिकाजी गाजरे यांनी विद्यार्थी तसेच शिक्षकांचे कौतुक केले. तसेच सदर उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. डी.डी. गाजरे यांचे मार्गदर्शन लाभले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सहशिक्षक श्री अर्जुन सुरवसे व श्री. युसुफ शेख यांनी परिश्रम घेतले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!