सोलापूर

ॲट्रॉसिटी अधिनियमांतर्गत मयताच्या पात्र वारसांना शासकीय नोकरीसाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अधिनियमांतर्गत मयताच्या पात्र वारसांना शासकीय नोकरीसाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

सोलापूर, दि 27 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार ॲट्रॉसिटी अधिनियमांतर्गत खून व मृत्यू झालेल्या पीडितांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याची कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांवर कार्यवाही करण्यात येत आहे.

दिवंगत दत्ता लक्ष्मण खंदारे यांच्या खून प्रकरणाची अक्कलकोट एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 926/2020 अन्वये नोंद झाली आहे. सदर गुन्ह्याची नोंद अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत करण्यात आली असून, या प्रकरणी पात्र वारसदारांचा शोध घेण्यात येत आहे. चौकशीअंती अद्याप वारसदारांची माहिती प्राप्त झालेली नाही.

त्यामुळे दिवंगत दत्ता लक्ष्मण खंदारे यांची पत्नी, अपत्ये वा अन्य कोणी कायदेशीर वारसदार असल्यास त्यांनी या जाहीर प्रकटनाच्या प्रसिद्धीपासून *15 दिवसांच्या आत* सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तिसरा मजला, सात रस्ता, सोलापूर येथे संपर्क साधून आपले वारसत्व सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करावीत.

यामध्ये वारस प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्म दाखला, रेशन कार्ड तसेच इतर संबंधित पुरावे सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.

निर्धारित मुदतीत कोणतीही हरकत, दावा अथवा वारसत्वाबाबतची माहिती प्राप्त न झाल्यास उपलब्ध अभिलेखांच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्यानंतर करण्यात येणारे कोणतेही दावे अथवा हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!