सोलापूर

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

सोलापूर, दि. ९ : ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता नियोजन भवन, सोलापूर येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव कार्तिकेयन एस. यांनी या बैठकीसंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. बैठकीत मागील बैठकीच्या इतिवृत्तांतास व त्यावरील कार्यवाहीच्या अहवालास मान्यता देण्यात येणार आहे.

बैठकीतील प्रमुख विषय
१. सन २०२५-२६ च्या खर्चास मान्यता : जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना यांचा दि. ३१ मार्च २०२६ अखेरच्या खर्चास मान्यता देण्यात येईल.
२. सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्यास मान्यता : जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ अंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना यांच्या कामांच्या प्रारूप आराखड्यावर चर्चा करून मान्यता दिली जाणार आहे.
३. आयत्यावेळचे विषय : मा. अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने आयत्यावेळचे विषय बैठकीत मांडण्यात येतील.

या बैठकीस सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी परिपूर्ण माहितीसह स्वतः उपस्थित राहावे, प्रतिनिधी पाठवू नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिल्या आहेत.
***

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!