सोलापूर
सोलापूरच्या चाळधारकांसाठी आनंदाची बातमी; ‘बिटू रद्द’ निर्णयाची विधानसभेत घोषणा
शहरातील विकासासह घरांची खरेदी-विक्री व कर्ज प्रक्रियेला मिळणार गती
सोलापूरच्या चाळधारकांसाठी आनंदाची बातमी; ‘बिटू रद्द’ निर्णयाची विधानसभेत घोषणा
शहरातील विकासासह घरांची खरेदी-विक्री व कर्ज प्रक्रियेला मिळणार गती.
सोलापूर : सोलापूर शहरातील चाळधारकांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. शहरातील ‘बिटू रद्द’ करण्याचा निर्णय जाहीर झाल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाला मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे चाळींच्या पुनर्विकासाला गती मिळणार असून, घरांची खरेदी-विक्री, बँक कर्ज मिळविण्याची प्रक्रिया तसेच मालमत्तेचे व्यवहार सुलभ होणार आहेत. अनेक वर्षांपासून या निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या चाळधारकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, या निर्णयामुळे सोलापूर शहराच्या विकासालाही नवी चा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा
संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर
9503822387



