क्राईम

सोलापूर पोलीस दलात मोठी अंतर्गत फेरबदल; १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, महत्त्वाच्या ठाण्यांना नवे नेतृत्व

उदयसिंह पाटील यांना जेलरोडची जबाबदारी; अजित लकडे पुन्हा सदर बझारला, विकास देशमुख फौजदार चावडीत

सोलापूर पोलीस दलात मोठी अंतर्गत फेरबदल; १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, महत्त्वाच्या ठाण्यांना नवे नेतृत्व

उदयसिंह पाटील यांना जेलरोडची जबाबदारी; अजित लकडे पुन्हा सदर बझारला, विकास देशमुख फौजदार चावडीत

सोलापूर : सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी शहर पोलीस दलातील प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार १५ पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव तर २ अधिकाऱ्यांच्या विशेष विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या आहेत. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

बदल्यांनुसार दादा सोमनाथ गायकवाड यांची विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावरून आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. विजय भानुदास खोमणे यांची एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दुय्यम पोलीस निरीक्षक पदावरून शहर वाहतूक शाखा (दक्षिण) येथे पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.

भालचंद्र सुभाष ढवळे यांची सदर बझार पोलीस ठाण्यातून सायबर सेल पोलीस ठाण्यात, तर भाऊराव श्रीधर बिराजदार यांची जेलरोड पोलीस ठाण्यातून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. श्रीशैल सिद्रामप्पा गजा यांची सायबर सेलमधून सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी, तर उमाकांत आनंद शिंदे यांची सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावरून विशेष शाखेत बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे सुरक्षा शाखेचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे.

या फेरबदलात चर्चेचा विषय ठरलेली बदली म्हणजे उदयसिंह शामराव पाटील यांची मानवी संसाधन विकास (वेल्फेअर) विभागातून जेलरोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती. तसेच जयदीप हनुमंत कळेकर यांची नियंत्रण कक्षातून जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी बदली झाली आहे.

बालक पांडुरंग कोळी यांची नियंत्रण कक्षातून अतिक्रमण विभागात, तसेच त्यांच्याकडे दंगा नियंत्रण पथकाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. आसिफ राजा बखतावर शेख यांची नियंत्रण कक्षातून महिला सुरक्षा कक्षात, तर संगीता तुळशीदास पाटील यांची सुरक्षा शाखेतून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अजित शंकर लकडे यांची आर्थिक गुन्हे शाखेतून पुन्हा एकदा सदर बझार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या पुनरागमनाची पोलीस वर्तुळात चर्चा सुरू आहे. स्नेहा प्रकाश म्हेतर यांची महिला सुरक्षा कक्षातून ए.एच.टी.यू. (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षात), तर वैष्णवी उदयसिंह पाटील यांची विशेष शाखेतून मानवी संसाधन विकास (वेल्फेअर) विभागात बदली करण्यात आली आहे.

रविंद्रनाथ कृष्णा भंडारे यांची शहर वाहतूक शाखा (दक्षिण) मधून सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष विनंतीवरून करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये सुहास भाऊराव चव्हाण यांची नियंत्रण कक्ष व दंगा नियंत्रण पथकातून विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी, तर विकास दगडोबा देशमुख यांची नियंत्रण कक्ष व जलद प्रतिसाद पथकातून पुन्हा एकदा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी सर्व बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ नवीन पदाचा कार्यभार स्वीकारून त्याचा पूर्तता अहवाल आयुक्तालयात सादर करावा, असे आदेश दिले आहेत. तसेच विकास देशमुख यांच्या बदलीनंतर जलद प्रतिसाद पथकाचा अतिरिक्त कार्यभार पोलीस उपनिरीक्षक पी. बी. बनसोडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

या व्यापक फेरबदलामुळे शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या कामकाजात अधिक गतिमानता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!