क्राईम

गुटखा वाहतूक करणाऱ्या इनोव्हा गाडीचा थरार; दोन मुलांना उडवले, दोघे गंभीर जखमी

गुटखा वाहतूक करणाऱ्या इनोव्हा गाडीचा थरार; दोन मुलांना उडवले, दोघे गंभीर जखमी

सोलापूर(प्रतिनिधी ):- प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एम.एच. 13 ए.एक्स. 1738 क्रमांकाच्या इनोव्हा गाडीने भरधाव वेगात जात असताना दोन अल्पवयीन मुलांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात दोन्ही मुले गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सदर इनोव्हा कार सोलापूरहून तुळजापूरकडे जात असताना मॉर्डन हायस्कूल, सांगवी–मार्डी परिसरात ही घटना घडली. विशेष म्हणजे याच गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित विमल व व्ही.आय. गुटख्याचा साठा वाहून नेला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणात चालक व गाडीतील आरोपींना ताब्यात घेण्यात आले असले, तरी या प्रतिबंधित गुटख्याचा मुख्य पुरवठादार (मास्टरमाइंड) कोण आहे, याचा अद्याप खुलासा झालेला नाही.
केवळ वाहकांवर कारवाई करून थांबू नये, तर गुटखा पुरवठा करणाऱ्या मुख्य आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

गुटखा वाहतुकीसाठी भरधाव गाड्या रस्त्यावर धावल्याने सामान्य नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे मुख्य सूत्रधार कोण?
कोणाच्या आदेशावरून ही वाहतूक?गुटखा कुठून आणला व कुठे पोहोचवायचा होता?
या सर्व मुद्द्यांचा सखोल तपास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी कठोर मुख्य आरोपींना जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.
“गुटख्याच्या काळ्या पैशासाठी रस्त्यावर निरपराध मुलांचे रक्त सांडत असेल, तर केवळ वाहकांवर कारवाई करून चालणार नाही. या अवैध धंद्यामागचा खरा सूत्रधार कोण आहे, तो कधी अटकेत येणार—हा सवाल आता संपूर्ण सोलापूर विचारत आहे.”
“अपघात घडवणारी गाडी सापडली, गुटखा जप्त झाला; पण या प्रतिबंधित मालाचा मालक कोण? कोणाच्या सांगण्यावरून ही वाहतूक सुरू होती? पोलिस तपासात हे ‘मोठे नाव’ कधी बाहेर येणार?”

“गुटख्यामुळे मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असेल, तर अशा अवैध पुरवठ्यावर कठोर कारवाई हवी. केवळ चालक नव्हे, तर गुटखा पुरवठा करणाऱ्या मुख्य आरोपींना अटक करा—हीच नागरिकांची ठाम मागणी आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!