जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नि. नंबर १ सोलापूर : कुंडलिक खुर्द यांची स्वीकृत संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नि. नंबर १ सोलापूर : कुंडलिक खुर्द यांची स्वीकृत संचालकपदी बिनविरोध निवड
सोलापूर (प्रबुध्द राज न्युज) :- जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नि. नंबर १, सोलापूर या संस्थेच्या संचालक मंडळाची विशेष सभा दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी पार पडली. या सभेत बार्शी येथील कुंडलिक खुर्द यांची स्वीकृत संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, सभासदाभिमुख निर्णयप्रक्रिया आणि आर्थिक शिस्त या मूल्यांना प्राधान्य देत कुंडलिक खुर्द यांची निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
या विशेष सभेला संस्थेच्या चेअरमन श्रीमती श्वेतांबरी राऊत, उप-चेअरमन श्रीधर कलशेट्टी, डॉ. एस. पी. माने (संचालक) यांच्यासह संचालक मंडळातील शहाजहान तांबोळी, विष्णू पाटील, सुरेश कुंभार, विजयकुमार घेरडे, विशाल घोगरे, गजानन मारडकर, शिवानंद म्हमाने, किरण लालबोंद्रे, शिवाजी राठोड, चेतन वाघमारे, तजमूल मुत्वल्ली, विकास शिंदे, सौ. एम. एस. शिंदे, रोहित घुले उपस्थित होते.
तसेच तज्ञ संचालक डॉ. पी. बी. नवले, सभासद डॉक्टर मनोज काशीद, संस्थेचे सचिव देशपांडे, लेखनिक सुभाष पवार, विनोद कदम आदी मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.
निवडीनंतर उपस्थितांनी कुंडलिक खुर्द यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. कुंडलिक खुर्द यांनीही सभासदांचा विश्वास कायम राखत संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.



