सोलापूर

सात रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागात दुर्लक्षित ब्रिटिशकालीन सर्वेक्षण दगड — संरक्षणाची तातडीची गरज

सोलापूर : सात रस्ता येथे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) क्र. 1 व क्र. 2 कार्यालयांच्या अगदी मधोमध इतिहासकालीन ब्रिटिश सर्वेक्षण दगड शांतपणे उभा आहे. दशकानुदशके नागरिक, याच मार्गाने ये-जा करत असले तरी या दगडाचे ऐतिहासिक महत्व अनेकांना आजवर माहितीच नाही. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि जनजागृतीचा अभाव यामुळे हा वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

ब्रिटिश राजवटीत संपूर्ण भारतात ग्रेट ट्रिगोनोमेट्रिकल सर्व्हे (GTS) अंतर्गत नकाशे तयार करण्यासाठी मोजणी मोहिम हाती घेण्यात आली होती. त्या काळात आधुनिक GPS किंवा अचूक सर्व्हे यंत्रणा नसल्यामुळे अशा दगडी खूणा विशिष्ट ठिकाणी बसवल्या जात.

हा दगड देशातील रेल्वे, रस्ते प्रकल्प, सिंचन व्यवस्था व नकाशा तयार करण्यासाठी
सीमा ओळख,अंतर मोजणी,नकाशा निर्मिती,शासकीय मालमत्तेची नोंद
या उद्देशांसाठी वापरला जात असे. त्यामुळे हा दगड सोलापूरचा भू-अभिलेख पुरावा मानला जातो

हा दगड उघड्यावर असून त्याचा आसपास कचरा माती आणि तन वाढलेले दिसत आहे या दगडाजवळ कोणतीही सुरक्षा किंवा जतनाची सोय नाही परिसरात त्याची देखभाल नाही,संरक्षण नाही,ओळख पटविणारा फलक नाही.

Oplus_16908288

“या दगडाजवळ काही कर्मचारी खिडकीतून मावा गुटखा तंबाखू थुंकत असल्याचेही चित्र अत्यंत लज्जास्पद आहे.”

सार्वजनिक बांधकाम विभागात दररोज शेकडो नागरिक, ठेकेदार, कर्मचारी, अधिकारी ये-जा करतात; मात्र या दगडाचा इतिहास आणि महत्त्व कोणालाही माहित नाही. त्यामुळे हा मौल्यवान पुरातत्व अवशेष अज्ञानात हरवत आहे.

नागरिकांचा आग्रह आहे की,
जिल्हाधिकारी,अधीक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता,उप अभियंता, शाखा अभियंता यांनी या स्थळाला भेट देऊन संरक्षण, माहितीफलक आणि नोंदणीची कार्यवाही करावी.

तज्ज्ञांच्या मते हा दगड“इतिहासकालीन भू-नकाशा प्रक्रियेचा महत्त्वाचा पुरावा असून त्याचे मूल्य पुरातत्व वारशाच्या दर्जाचे आहे.”

दगडाभोवती संरक्षक कॅसिंग करावी,”ब्रिटिश सर्व्हे मार्कर – 18xx” असा माहिती फलक बसवावा.या ठिकाणाची वारसा,सूचीमध्ये नोंद करावी,शासकीय कार्यालयात येणाऱ्या लोकांना याची माहिती उपलब्ध करावी

आज जी गोष्ट अनोळखी दगड वाटते, ती उद्या सोलापूरचा अभिमान ठरू शकते. हा दगड केवळ दगड नाही; तो सोलापूरचा भू-इतिहास आणि ब्रिटिश सर्व्हे सिस्टिमचा साक्षीदार आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!