महाराष्ट्र

युनेस्कोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक पुतळा; पॅरिसमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांचे चैत्यभूमीला अभिवादन

युनेस्कोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक पुतळा; पॅरिसमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांचे चैत्यभूमीला अभिवादन

मुंबई ( प्रतिनिधी):- पॅरिस येथील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी यांनी दादर येथील ला भेट देत भारतरत्न यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी आंबेडकरांच्या विचारसरणीला आणि सामाजिक न्यायासाठीच्या त्यांच्या योगदानाला विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.

दरम्यान, च्या पॅरिस येथील मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोमध्ये स्थापित झाल्याने या घटनेला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून तसेच शिक्षण, मानवाधिकार आणि सामाजिक समतेच्या मूल्यांचे जागतिक स्तरावर प्रसारक म्हणून आंबेडकरांचे योगदान अधोरेखित करणारा हा क्षण ठरला आहे.

या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना राजदूत विशाल व्ही. शर्मा यांनी सांगितले की, जगभरातील नागरिकांना डॉ. आंबेडकर यांनी भारताला दिलेल्या संविधानाची ओळख करून देणे, तसेच शिक्षण, मानवाधिकार आणि सामाजिक समतेची मूल्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित करणे हा या पुतळा स्थापनेचा मुख्य हेतू आहे. युनेस्कोच्या व्यासपीठावरून हा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चैत्यभूमीला दिलेल्या भेटीमुळे देशातील आंबेडकरी चळवळीशी असलेली आपुलकी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांचा सन्मान या दोन्ही बाबी अधोरेखित झाल्या आहेत. युनेस्कोतील हा पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागतिक ठसा अधिक गडद करणारा ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!