सोलापूर

विमानतळ परिसरातील मांस विक्रेत्यांवर कडक नियम – उघड्यावर विक्रीला बंदी

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर विमानतळावर सुरू झालेल्या वाढत्या विमानसेवेच्या पार्श्वभूमीवर शहरात आणि विमानतळ परिसरात स्वच्छता, सुरक्षा आणि कचरा व्यवस्थापनाबाबत सोलापूर महानगरपालिकेने कडक भूमिका घेतली आहे. विमानतळ, होटगी रोड आणि आसपासच्या परिसरात शासकीय यंत्रणांच्या संयुक्त बैठकीत विमान सुरक्षिततेसाठी आवश्यक बाबींवर व्यापक निर्णय घेण्यात आले आहेत.

Oplus_16908288

ही कार्यवाही विमानपत्तन प्राधिकरणाने जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या विनंतीनुसार सुरू करण्यात आली असून महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या देखरेखीखाली काम सुरू आहे.

उघड्यावर मांस विक्रीला बंदी — नवीन नियम लागू

विमानतळ परिसरातील “नई जिंदगी” भागात मोठ्या प्रमाणात चिकन, मटन आणि मांस व्यवसाय चालतो.
या भागातील सर्व दुकानांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून-

उघड्यावर मांस विक्री पूर्णपणे बंद

विक्री केवळ झाकून किंवा बंदिस्त पद्धतीनेच

टाकाऊ मांस, कचरा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकण्यास मनाई

कचरा बंद डब्यात ठेवणे अनिवार्य

ही पावले पक्षी आणि मोकाट प्राण्यांची उपस्थिती टाळण्यासाठी करण्यात आली आहेत, कारण ते विमान उड्डाणांसाठी धोकादायक ठरू शकतात.

विक्रेत्यांचा टाकाऊ कचरा व्यवस्थित संकलित करण्यासाठी महानगरपालिकेने:

सकाळ आणि दुपारी दोन स्वतंत्र घंटागाड्या

कचरा घेताना नोंद व स्वाक्षरी अनिवार्य

निरीक्षणासाठी नियुक्त आरोग्य निरीक्षकांची नियमित तपासणी

तक्रारींसाठी विशेष अधिकारी नियुक्त,नियमांचे उल्लंघन झाल्यास त्वरित तक्रार करण्यासाठी खालील अधिकारी उपलब्ध:

अधिकारी भूमिका संपर्क क्रमांक

श्री. विजयकुमार तमशेट्टी मुख्य आरोग्य निरीक्षक 9420781516

श्री. सुर्यकांत लोखंडे मुख्य आरोग्य निरीक्षक 9096843418

श्री. प्रकाश नरळे आरोग्य निरीक्षक 9423993935

श्री. वाहिद पेरमपल्ली आरोग्य निरीक्षक 9325281239

श्री. अजय जगताप आरोग्य निरीक्षक 7741898928

तक्रारकर्त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.शहरातील सर्व मांस विक्रेत्यांचे सर्वेक्षण पूर्ण सोलापूर शहरात एकूण ३६२ मांस विक्रेते असून:

त्यापैकी काहींकडे परवाना नाही

काहींच्या परवान्यांचे नूतनीकरण झालेले नाही

अशा विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाव्दारे कारवाई करण्यात येणार आहे.

आता परवान्यासोबत
महानगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) आवश्यक असेल.

महानगरपालिकेने नागरिकांना विनंती केली आहे की-

मांसकचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणे

विमानतळ परिसरात अस्वच्छता

नियमांचे उल्लंघन करणारे व्यवसाय
असे प्रकार दिसल्यास त्वरित वर नमूद केलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.वाढत्या विमानसेवेच्या दृष्टीने सोलापूर महानगरपालिकेची ही मोहीम शहराच्या स्वच्छता, आरोग्य आणि विमानसुरक्षेच्या दिशेने महत्त्वपूर्ण आणि वेळेवर उचललेले पाऊल मानले जात आहे.

महापालिकेचा उद्देश-
“सुरक्षित, स्वच्छ आणि विमानसेवा-मैत्रीपूर्ण सोलापूर”

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!