होटगीत आयटी पार्कला ग्रीन सिग्नल; १८ महिन्यांत उभे राहणार सोलापूरचे नवे टेक हब – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
होटगीत आयटी पार्कला ग्रीन सिग्नल; १८ महिन्यांत उभे राहणार सोलापूरचे नवे टेक हब – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर (प्रबुध्द राज न्युज):- सोलापूर शहरात आयटी उद्योगाला मोठी गती देणारा महत्त्वाचा निर्णय हाती घेतला असून, होटगी येथे प्रस्तावित असलेल्या आयटी पार्कचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सुमारे ४० कोटींच्या खर्चाने उभारण्यात येणाऱ्या या आयटी पार्कचे बांधकाम १८ महिन्यांत पूर्ण होईल, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे पाठवण्यात आला असून, लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.

राज्य शासनाने आयटी पार्कसाठी योग्य जागेचा शोध घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाने हिरज, कुंभारी, जुनी मिल, होटगी अशा चार ठिकाणांची पाहणी केली. त्यानुसार होटगी येथील जलसंपदा विभागाच्या मालकीची ५० एकर जागा योग्य ठरवण्यात आली आहे.
ही जागा यापूर्वी लॉजिस्टिक पार्कसाठी दिली होती.
आता तीच जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (MIDC) हस्तांतरित, जलसंपदा विभागाला सुमारे ३.५ कोटी रुपये मोबदला देण्यात येणार, आयटी पार्क परिसरात रस्ते, स्ट्रीटलाईट्स, पाणीपुरवठा, ड्रेनेज अशा मूलभूत सुविधांसाठी ३७ ते ३८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.या पार्कमध्ये ४० ते ४५ हजार आयटी व्यावसायिक काम करू शकतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

होटगी रोडवरील विमानतळाच्या फ्लाईट पाथमुळे प्रकल्पाला अडथळा निर्माण होणार का, याबाबत अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र प्रस्तावित जागा विमानसेवेच्या फनेल क्षेत्रात येत नाही इमारतींची ५० मीटर उंचीपर्यंत बांधकामाला मान्यता विमानतळ प्रशासनानेही सकारात्मक अभिप्राय दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले
होटगी रोडवरील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची डिस्टिलरी २० KPLD क्षमतेवरून पुढील वर्षी १०० KPLD क्षमतेवर जाणार आहे. मात्र, यात ZLD (Zero Liquid Discharge) तंत्राचा वापर केल्याने मळीचा वास पूर्णपणे नियंत्रित राहणार आहे.कारखाना चेअरमन धर्मराज काडादी यांनी याबाबत सर्व माहिती जिल्हाधिकाऱ्यांना भेटून दिल्याचेही सांगण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, होटगी येथे IT कंपन्यांना पुण्याच्या हिंजवडीपेक्षा खूप कमी खर्चात जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये टेक इंडस्ट्री गुंतवणुकीची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.



