क्राईम

लाखाची लाच स्वीकारताना शिक्षण उपनिरीक्षक रंगेहाथ अटक — अँटी करप्शन ब्युरोची मोठी कारवाई

पुणे (प्रतिनिधी) :- अँटी करप्शन ब्युरो, पुणे परिक्षेत्राने दि. 25 नोव्हेंबर 2025 रोजी मोठी कारवाई करत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब भगवान मिरगणे (वय 57) यांना 1 लाख रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाणे अंतर्गत करण्यात आली असून आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

56 वर्षीय तक्रारदार यांच्या पत्नी सोलापूर जिल्ह्यातील एका माध्यमिक शाळेत सहशिक्षिका म्हणून 2016 पासून विना वेतन सेवा बजावत असून त्यांचा शालार्थ आयडी मंजूर झाल्यानंतर वेतन सुरू होणार होते.

यासाठी तक्रारदारांनी शालार्थ आयडीचा प्रस्ताव 16 जून 2025 रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे येथे दाखल केला होता.

हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आरोपी शिक्षण उपनिरीक्षक मिरगणे यांनी तक्रारदाराकडून 1 लाख रुपयांची मागणी केली, अशी तक्रार 17 नोव्हेंबर रोजी ACB कडे नोंदवण्यात आली.

तक्रार नोंद 17/11/2025
लाच मागणी पडताळणी 17/11/2025 व 21/11/2025
सापळा 25/11/2025 रोजी 6:21 वाजता

21 नोव्हेंबर रोजी सुबोध पडताळणीत मिरगणे यांनी लाच मागणीची पुष्टी केली तसेच स्वीकारण्याची तयारीदेखील दर्शवली.

आज सापळ्यात आरोपीने त्याच्या केबिनमध्ये पंचासमक्ष 1 लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच ACBने त्याला ताब्यात घेतले.

ही कारवाई खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली
सापळा अधिकारी श्री. प्रसाद लोणारे, पोलीस निरीक्षक
तपास अधिकारी श्री. सतीश वाळके, सहा. पोलीस आयुक्त
मार्गदर्शन श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस उप आयुक्त

अँटी करप्शन ब्युरोने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय कामासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त कुणीही लाच मागत असल्यास खालील माध्यमांद्वारे तक्रार करावी:

📞 020-26122134 / 9403781064
📲 व्हॉट्सअॅप : 9403781064 / 9930997700

शिक्षण विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचे हे प्रकरण गंभीर असून वेतनासाठी 9 वर्षे प्रतीक्षा करणाऱ्या शिक्षकाकडून लाच मागणे अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!