महाराष्ट्र

दारू विक्री परवान्यांच्या स्थलांतरावर नवा नियम : सोसायटीची NOC अनिवार्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

दारू विक्री परवान्यांच्या स्थलांतरावर नवा नियम : सोसायटीची NOC अनिवार्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर (प्रतिनिधी) :- राज्यातील एफ.एल.–२ आणि सी.एल.–३ परवानाधारक विदेशी आणि देशी दारू किरकोळ विक्री केंद्रांच्या स्थलांतर प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. दुकान जर कोणत्याही नोंदणीकृत सोसायटीच्या हद्दीत येत असेल, तर त्या सोसायटीकडून अनिवार्यपणे ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ (NOC) घेणे बंधनकारक असेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेतील प्रश्नोत्तरांच्या सत्रात सदस्यांनी दारू दुकाने निवासी भागात हलविणे, त्यामुळे होणारा त्रास, तसेच स्थानिकांच्या आक्षेपांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोसायटी परिसरातील शिस्त राखण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

यापुढे एखादे एफ.एल.–२ (विदेशी दारू किरकोळ विक्री) किंवा सी.एल.–३ (देशी दारू किरकोळ विक्री) परवाना धारक दुकान सोसायटी परिसरात स्थलांतर करण्याची इच्छा व्यक्त करत असल्यास, संबंधित सोसायटीची मंजुरी मिळाल्याशिवाय अर्ज मंजूर केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारच्या या निर्णयामुळे अनधिकृत किंवा स्थानिकांच्या संमतीशिवाय उघडण्यात येणाऱ्या दारू दुकाने रोखण्यास मदत होणार आहे, असेही पवार यांनी सांगितले. तसेच, नियमावली स्पष्टपणे परिपूर्ण करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने संबंधित मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना पाठविल्याचेही त्यांनी नमूद केले.

या निर्णयाचे स्वागत अनेक नागरी संस्था आणि सोसायटी संघटनांकडून केले जाईल, कारण यामुळे परिसरातील शांतता, सुरक्षितता आणि शिस्त राखण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!