एसटी महामंडळात अप्रेंटिसची संधी! सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

एसटी महामंडळात अप्रेंटिसची संधी! सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती
सोलापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागात तरुणांसाठी अप्रेंटिसशिपची संधी उपलब्ध झाली आहे. शिकाऊ उमेदवार भरती २०२६-२७ अंतर्गत विविध व्यवसायांसाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी तब्बल ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन MSRTC Solapur Division या आस्थापनेसाठी नोंदणी करावी. त्यासाठी आस्थापना नोंदणी क्रमांक E09162700889 देण्यात आला आहे.
१४ सप्टेंबर २०२६ ही अर्ज नोंदणीची अंतिम तारीख असून, इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागाकडून करण्यात आले आहे.
या अप्रेंटिस भरतीसंदर्भातील पात्रता, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया तसेच इतर तपशील जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी सोलापूर विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.
संपर्काचे ठिकाण :
विभागीय कार्यालय,
१९०, बुधवार पेठ,
सोलापूर – ४१३००२.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी संबंधित विभागीय कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन विभाग नियंत्रक अमोल चंदकांत गोंजारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
त्यामुळे एसटी महामंडळात शिकाऊ उमेदवार म्हणून प्रशिक्षणाची संधी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांनी १४ सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



