महाराष्ट्र

“अजित पवारांचा ‘शेवटचा व्हिडिओ’ व्हायरल? DGIPR फॅक्टचेकमध्ये मोठा खुलासा!”

“अजित पवारांचा ‘शेवटचा व्हिडिओ’ व्हायरल? DGIPR फॅक्टचेकमध्ये मोठा खुलासा!”

मुंबई (प्रतिनिधी) :- सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वीचा “शेवटचा व्हिडिओ” म्हणून एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, हा व्हिडिओ पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) केलेल्या फॅक्टचेकमध्ये ही बाब उघडकीस आली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अजित पवार हे रात्रीच्या वेळी एका खाजगी जेटमध्ये चढताना दिसत आहेत. मात्र, DGIPRच्या तपासणीनुसार हा व्हिडिओ २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघाताशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाही.

DGIPR फॅक्टचेकनुसार,
▪️ व्हायरल व्हिडिओ रात्रीच्या वेळी चित्रित केलेला आहे.
▪️ त्या व्हिडिओमधील खाजगी विमानाचा नोंदणी क्रमांक VT-CR मालिकेतील आहे.
तर दुसरीकडे,
▪️ २८ जानेवारी २०२६ रोजी झालेला अपघात सकाळी उजेडात घडला होता.
▪️अपघातग्रस्त विमान हे Learjet 45XR (नोंदणी क्रमांक VT-SSK) होते, जे मुंबईहून उड्डाण केले होते.

या दोन्ही बाबींची तुलना करता, वेळेतील फरक आणि विमानाच्या नोंदणी क्रमांकातील तफावत स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे व्हायरल व्हिडिओ हा जुन्या प्रवासाचा असून तो अपघाताशी जोडणे चुकीचे आहे, असे DGIPRने ठामपणे सांगितले आहे.

DGIPR ने नागरिकांना आवाहन केले आहे की,
भावनिक वातावरणाचा गैरफायदा घेत सोशल मीडियावर पसरवले जाणारे अप्रमाणित व्हिडिओ, फोटो आणि दावे पुढे शेअर करू नयेत. कोणतीही माहिती खरी आहे की नाही, याची खातरजमा केल्यानंतरच प्रतिक्रिया द्यावी.

अशा प्रकारच्या खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या पोस्टमुळे समाजात गैरसमज, भीती आणि अफवा पसरतात. त्यामुळे अधिकृत स्त्रोतांकडून मिळणारी माहितीच ग्राह्य धरावी, असेही DGIPRने स्पष्ट केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!