सोलापूर

मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

पुणे, दि. २२: विधान परिषद निवडणुकीच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १० पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली आहे.

पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक या दोन्ही मतदार संघांसाठी शुक्रवार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमती तेली-उगले यांनी ही माहिती दिली आहे. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे असे मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करतील.

मतदार ओळखपत्र (इपीक) सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १० पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. आधार कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, पारपत्र (पासपोर्ट), केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर खासगी औद्योगिक संस्थांद्वारे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार किंवा विधान परिषद सदस्य यांना दिलेली अधिकृत ओळखपत्रे, संबंधित शिक्षक/पदवीधर मतदार संघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत, त्या शैक्षणिक संस्थांनी जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरीत मूळ पदवी/पदविका प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले शारीरिक दिव्यांगात्वाचे मूळ प्रमाणपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने जारी केलेले युनिक डिसॅबिलिटी ओळखपत्र हे पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

मतदारांनी मतदार ओळखपत्र किंवा वरीलपैकी एक ओळखीचा पुरावा सोबत ठेवून मतदानाचा हक्क प्राधान्याने बजवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती तेली- उगले यांनी केले आहे.
0000

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!