सोलापूर

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ९२ वी वार्षिक सभा उत्साहात; रक्तदान शिबिर, सेवानिवृत्तांचा गौरव अन् विकासाचा निर्धार

सभासदांच्या सूचनांची दखल घेण्याचे आश्वासन; ई-व्ही बाईक कर्जधारकांसाठी नव्या कर्जसुविधेची घोषणा

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ९२ वी वार्षिक सभा उत्साहात; रक्तदान शिबिर, सेवानिवृत्तांचा गौरव अन् विकासाचा निर्धार

सभासदांच्या सूचनांची दखल घेण्याचे आश्वासन; ई-व्ही बाईक कर्जधारकांसाठी नव्या कर्जसुविधेची घोषणा

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नियमित क्र. १, सोलापूर या संस्थेची ९२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. संस्थेच्या चेअरमन सौ. श्वेतांबरी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस संस्थेचे मार्गदर्शक पंडितराव भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

सभेपूर्वी सकाळी ११ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी रुग्णालयाच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदात्यांना प्रमाणपत्रे व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

सभेच्या प्रारंभी चेअरमन सौ. श्वेतांबरी राऊत यांनी प्रास्ताविक करत संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्यानंतर सचिवांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सभेपुढे ठेवण्यात आलेले सर्व विषय व ठराव सभासदांनी सर्वानुमते मंजूर केले.

सभेदरम्यान अनेक सभासदांनी संस्थेच्या कामकाजाबाबत सूचना व मते मांडली. त्यांची नोंद घेऊन त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन चेअरमन यांनी दिले. तसेच सभासदांनी वार्षिक अहवालासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले असता संचालक मंडळाने समर्पक उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले.

मार्गदर्शक पंडितराव भोसले यांनी संस्थेच्या भविष्यातील वाटचालीबाबत मार्गदर्शन करताना, “संस्थेची सातत्याने प्रगती करा आणि विश्वस्त भावनेतून काम करा,” असे आवाहन केले. सभेनंतर संस्थेच्या विविध विषयांवर सकारात्मक व विधायक चर्चा झाली.

यावेळी व्हा. चेअरमन कलशेट्टी यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत ई-व्ही (इलेक्ट्रिक वाहन) बाईक खरेदीसाठी कर्ज घेतलेल्या आणि त्या कर्जाची ५० टक्के परतफेड पूर्ण केलेल्या सभासदांना एक लाख रुपयांपर्यंतचे नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडला.

सभेत सेवानिवृत्त सभासदांचा शाल व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचा लाभांश सभासदांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने सोमवारी जमा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमास मार्गदर्शक पंडितराव भोसले, दयानंद परिचारक, श्रीशैल देशमुख, नित्यानंद शिंदे तसेच संचालक डॉ. एस. पी. माने, विष्णू पाटील, शहाजहान तांबोळी, सुरेश कुंभार, तजमूल मुतवली, शिवाजी राठोड, चेतन वाघमारे, विकास शिंदे, गजानन मारडकर, किरण लालबोंद्रे, सौ. मृणालिनी शिंदे, विजयसिंह घेरडे, रोहित घुले, विशाल घोगरे, शिवानंद म्हमाने, तज्ञ संचालक डॉ. पांडुरंग नवले, स्वीकृत संचालक कुंडलिक खुर्द यांच्यासह कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक विष्णू पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुभाष काळे व विनोद कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!