सोलापूर

सोलापूर विभागातील दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा गौरव; संरक्षा पुरस्काराने सन्मान

येडशी–ढोकी व दुधनी–वाडी मार्गावर सतर्कतेने टळले अपघात

सोलापूर विभागातील दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा गौरव; संरक्षा पुरस्काराने सन्मान

येडशी–ढोकी व दुधनी–वाडी मार्गावर सतर्कतेने टळले अपघात

सोलापूर (प्रतिनिधी):- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दोन दक्ष कर्मचाऱ्यांनी वेळीच दाखवलेल्या सतर्कतेमुळे संभाव्य रेल्वे अपघात टळले असून, त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेचा गौरव म्हणून त्यांना महाव्यवस्थापकांचा ‘संरक्षा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
हा सन्मान १५ एप्रिल २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमात महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

•पुरस्कार विजेते व त्यांचे कार्य•

*श्री रमेश तनमोर (तंत्रज्ञ – TRD, धाराशिव)*

दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी येडशी–ढोकी रेल्वे मार्गावर गस्त घालत असताना, त्यांनी OHE खांबावरील ‘RRA क्लॅम्प’ वाकलेला आणि पिळवटलेला असल्याचे पाहिले. ही बाब गंभीर होती, कारण त्यामुळे ओव्हरहेड वायर तुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देत वेळेवर उपाययोजना केली आणि मोठा अपघात टाळला.

*श्री योगेंद्र कुमार (तंत्रज्ञ – TRD, दुधनी)*

दि. २८ जानेवारी २०२६ रोजी दुधनी–वाडी विभागात तपासणीदरम्यान त्यांनी ‘IR वायर ड्रॉपर’ तुटलेला व लटकलेला असल्याचे निदर्शनास आणले. ही बाब रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक होती. त्यांनी त्वरित वरिष्ठांना कळवून आवश्यक कारवाई घडवून आणली, ज्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.

या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे रेल्वेच्या सुरक्षित परिचालनाला मोठा हातभार लागला आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना पदक, प्रशस्तिपत्र, विशेष उल्लेख (Citation) आणि ३५०० रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले.

महाव्यवस्थापकांनी या कर्मचाऱ्यांचे कौतुक करत सांगितले की, अशा प्रकारची जबाबदारी आणि जागरूकता हीच रेल्वे सुरक्षेची खरी ताकद आहे. त्यांच्या या कार्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला चंद्र किशोर प्रसाद (प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी) यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की, प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे मालमत्तेचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी अशा सतर्क कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!