महाराष्ट्र

हिवाळी अधिवेशनात ऐतिहासिक उपक्रम; ‘लोकराज्य’ मासिकाचे दुर्मिळ अंक आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध

नागपूर (प्रतिनिधी) :- नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकराज्य’ मासिकाच्या दुर्मिळ अंकांचे विशेष प्रदर्शन आणि प्रथम टप्प्यात डिजिटल स्वरूपात उपलब्ध केलेल्या ५० ऐतिहासिक अंकांचे लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने हा उपक्रम राबवला आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन व डिजिटल अंकांचे लोकार्पण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी प्रभारी उपसचिव अजय भोसले,संचालक (माहिती) (प्रशासन) किशोर गांगुर्डे,संचालक (माहिती) नागपूर विभाग गणेश मुळे,संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी,कक्ष अधिकारी युवराज सोरेगावकर व जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार या मान्यवरांची उपस्थिती होती.

तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी विधानभवन परिसरात उभारलेल्या विशेष प्रदर्शनाला लोकप्रतिनिधी, पत्रकार व अभ्यासकांनी भेट दिली.

‘लोकराज्य’ हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत मासिक असून, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून,राज्यातील विविध ऐतिहासिक घटनांचा नोंद,लोककल्याणकारी धोरणांचा प्रवास,शासनाची दिशा, भूमिका आणि निर्णय प्रक्रिया,सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय बदल यांची माहिती या मासिकाद्वारे नोंदवली गेली आहे.

हे मासिक शासनाच्या धोरणे, निर्णय प्रक्रिया आणि लोकप्रशासनाच्या इतिहासाचा दस्ताऐवजी संग्रह मानले जाते. इतिहासाच्या अमूल्य नोंदी जतन करण्याच्या उद्देशाने, पहिल्या टप्प्यात ५० दुर्मिळ अंक डिजिटल स्वरूपात स्कॅन करून संग्रहित करण्यात आले आहेत.

याबाबत बोलताना प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले , “हा बहुमोल ऐतिहासिक संग्रह आता डिजिटल फॉरमॅटमध्ये उपलब्ध होत आहे. लवकरच तो गुगलसह विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केला जाणार आहे.
संशोधक, विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी ही ऐतिहासिक उपलब्धी आहे.”

हिवाळी अधिवेशनादरम्यान झालेले हे लोकार्पण राज्याच्या प्रशासकीय इतिहास आणि सरकारी माहिती प्रणालीला डिजिटल परिवर्तनाच्या नव्या टप्प्यात घेऊन जाणारा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!