क्राईम

नांदणी आरटीओ चेक पोस्टवर जालन्याच्या अँटी करप्शनची धाड! सोलापूरचे एक अधिकारी अटकेत, प्रशासनात खळबळ

*नांदणी आरटीओ चेक पोस्टवर जालन्याच्या अँटी करप्शनची धाड! सोलापूरचे एक अधिकारी अटकेत, प्रशासनात खळबळ

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्ह्यातील नांदणी आरटीओ चेक पोस्टवर अँटी करप्शन ब्युरो (ACB) कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. जालन्या येथील एसीबी पथकाने अचानक धाड टाकत सोलापूरचे एक अधिकारी अटकेत घेतल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

Oplus_16908288

प्राथमिक माहितीनुसार, नांदणी चेक पोस्टवर कार्यरत असलेल्या एक आरटीओ अधिकाऱ्यांवर लाचखोरीचे गंभीर आरोप होते. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर जालन्याच्या एसीबी पथकाने सापळा रचत ही कारवाई केल्याचे समजते. कारवाईदरम्यान आवश्यक कागदपत्रे, रोकड व इतर पुराव्यांची तपासणी करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे नांदणी चेक पोस्टवरील कथित गैरप्रकार पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून, वाहनचालकांकडून होणाऱ्या बेकायदेशीर वसुलीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एसीबीकडून पुढील चौकशी सुरू आहे.

दरम्यान, या घटनेबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा असून, अटक केलेल्या अधिकाऱ्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे समजते. नांदणी आरटीओ चेक पोस्टवरील कारभार किती पारदर्शक आहे, याबाबत आता गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!