सोलापूर

जिल्हा परिषद इमारतीतच ‘शिक्षणाची चूक’… प्राथमिक की ‘प्रथमिक’?

जिल्हा परिषद इमारतीतच ‘शिक्षणाची चूक’… प्राथमिक की ‘प्रथमिक’?

विद्यार्थ्यांना शुद्ध लेखन शिकवणारा विभाग स्वतःच चुकतोय?

सोलापूर (प्रबुध्द राज न्युज):- सोलापूर जिल्हा परिषद इमारतीत नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी विविध विभागांची कार्यालये दर्शविणारे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. मात्र, याच फलकांवर शिक्षण विभागाशी संबंधित गंभीर दुर्लक्ष समोर आले आहे. फलकावर प्राथमिक शिक्षण विभाग असे लिहिणे अपेक्षित असताना, त्याठिकाणी चुकून “प्रथमिक” असा चुकीचा शब्दप्रयोग करण्यात आला आहे.

ही चूक एखाद्या सर्वसामान्य कार्यालयाची नसून, थेट शिक्षण विभागाशी संबंधित असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे ही चुकीची पाटी अनेक दिवसांपासून तशीच लावलेली असून, अद्याप तिची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

शिक्षण विभाग हा विद्यार्थ्यांना शुद्ध लेखन, योग्य भाषा आणि ज्ञानाचे धडे देणारा विभाग मानला जातो. मात्र, त्याच विभागाच्या नावात अशी भाषिक चूक असणे हे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहे. जिल्हा परिषदेस भेट देणारे शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच नागरिक दररोज ही पाटी पाहत असून, तरीही संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या कार्यपद्धतीवर टीका होत असून, “इतकी साधी चूकही दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाला इतके दिवस लागतात का?” असा सवाल नागरिक विचारत आहेत. शिक्षणासारख्या संवेदनशील विभागात अशा चुका राहणे हे संस्थेच्या प्रतिमेला धक्का देणारे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
आता प्रश्न उपस्थित होत आहे की,
* ही चूक नेमकी कधी दुरुस्त होणार?
* संबंधित विभागाचे अधिकारी याची दखल घेणार का?
* की ‘प्रथमिक’च पुढे ‘प्राथमिक’ ठरणार?

प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन ही चूक दुरुस्त करावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!