मिशन TET:महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा; सोलापुरातील ४७ केंद्रांवर २८ हजारांहून अधिक उमेदवारांची परीक्षा
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांचे नियोजनावर भर

मिशन TET:महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा; सोलापुरातील ४७ केंद्रांवर २८ हजारांहून अधिक उमेदवारांची परीक्षा
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांचे नियोजनावर भर
सोलापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2026 रविवार, २८ जून २०२६ रोजी राज्यभर आयोजित करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात या परीक्षेसाठी एकूण ४७ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून तब्बल २८ हजार २९८ परीक्षार्थी परीक्षेला बसणार आहेत.
परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.

बैठकीस जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा कोषागार अधिकारी वैभव राऊत, कोषागार अधिकारी रणजीत कदम तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
• प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना •
बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी खालील सूचना दिल्या
* ४ ते ५ भरारी पथकांची नियुक्ती करावी.
* सर्व ४७ परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा.
* प्रश्नपत्रिका कोषागार कार्यालयात सुरक्षित ठेवाव्यात.
* प्रश्नपत्रिका केंद्रांपर्यंत पोहोचविताना पोलीस सुरक्षा द्यावी.
* आवश्यक मनुष्यबळाची तात्काळ नियुक्ती करावी.
* अतिरिक्त १० ते १५ टक्के मनुष्यबळ राखीव ठेवावे.
* परीक्षा केंद्रांवर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध असाव्यात.
दोन सत्रांत होणार परीक्षा
बैठकीत माहिती देताना प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले की
पेपर क्रमांक १
वेळ : सकाळी १०.३० ते दुपारी १.००
परीक्षार्थी संख्या : १२,२६१
पेपर क्रमांक २
वेळ : दुपारी २.३० ते सायंकाळी ५.००
परीक्षार्थी संख्या : १६,०३७
एकूण
परीक्षा केंद्रे : ४७
परीक्षार्थी : २८,२९८
• सोलापूरमधील ४७ परीक्षा केंद्रांची यादी •
१) संगमेश्वर पब्लिक स्कूल
सात रस्ता, संगमेश्वर कॉलेज परिसर, सोलापूर
२) हरिबाई देवकरण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय
होम मैदानासमोर, सोलापूर
३) एस.व्ही.सी.एस. हायस्कूल
एमआयडीसी, अक्कलकोट रोड, सोलापूर
४) एस.व्ही.सी.एस. हायस्कूल
८४, भवानी पेठ, सोलापूर
५) नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल
निलम नगर, एमआयडीसी, सोलापूर
६) सिंहगड पब्लिक स्कूल
केगाव, सोलापूर विद्यापीठासमोर
७) जे.आर. चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय
बाळे, उत्तर सोलापूर
८) एस.एस.ए. उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय
मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर
९) स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूल
पोलीस मुख्यालय, अशोक चौक
१०) श्री दिगंबर जैन गुरुकुल हायस्कूल
बाळीवेस, बुधवार पेठ
११) सिद्धेश्वर बॉईज हायस्कूल
सिद्धेश्वर पेठ
१२) संगमेश्वर कॉलेज
रेल्वे लाईन्स
१३) अनप्पा कदाड हायस्कूल
भवानी पेठ, तुळजापूर वेस
१४) वालचंद कला व विज्ञान महाविद्यालय
अशोक चौक
१५) कुचन हायस्कूल
रविवार पेठ
१६) श्री सिद्धेश्वर बाल मंदिर इंग्रजी माध्यम शाळा
भवानी पेठ
१७) सोलापूर सोशल असोसिएशन कला व वाणिज्य महाविद्यालय
सिद्धेश्वर पेठ
१८) बेगम कमरुन्निस्सा करिगीर मुलींचे हायस्कूल
सिद्धेश्वर पेठ
१९) सेंट जोसेफ हायस्कूल
रेल्वे लाईन्स
२०) पोदार इंटरनॅशनल स्कूल
विजापूर रोड
२१) नवलबाई फुलचंद शहा कोठारी हायस्कूल
कुमठा नाका
२२) व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूल
अक्कलकोट रोड
२३) जागृती विद्या मंदिर
नेहरू नगर
२४) भारती विद्यापीठ माध्यमिक विद्यालय
जुळे सोलापूर
२५) प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी उर्दू हायस्कूल
दक्षिण सदर बाजार
२६) सुरजबाई रामलाल मुलींचे हायस्कूल सेवासदन
मुरारजी पेठ
२७) मॉडर्न हायस्कूल
कॅम्प, सोलापूर
२८) म. आ. पांगल अँग्लो उर्दू हायस्कूल
सिद्धेश्वर पेठ
२९) संभाजीराव शिंदे प्रशाला
मुरारजी पेठ
३०) सिद्धेश्वर गर्ल्स हायस्कूल
सिद्धेश्वर पेठ
३१) छत्रपती शिवाजी प्रशाला
मुरारजी पेठ
३२) उमाबाई श्राविका विद्यालय
न्यू बुधवार पेठ
३३) विलासचंद्र मोतीचंद मेहता हायस्कूल
विशाल नगर, जुले सोलापूर
३४) चंद्रभागाबाई यलगुरवार प्रशाला
होटगी रोड
३५) शरदचंद्र पवार प्रशाला
अवंती नगर
३६) रावजी सखाराम हायस्कूल
बुधवार पेठ
३७) राज मेमोरियल इंग्लिश स्कूल
मुरारजी पेठ
३८) एस.आर. चंदक इंग्लिश हायस्कूल
बुधवार पेठ.
३९) श्री दत्त प्रशाला
श्रीशैल नगर, एमआयडीसी
४०) सोनामाता आदर्श कन्या विद्यालय
रेल्वे लाईन
४१) सखुबाई हिराचंद नेमचंद प्रशाला
गोल्ड फिंच पेठ
४२) श्री वसंतराव नाईक हायस्कूल
नॉर्थ सदरबाजार
४३) बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल
उजनी कॉलनी, कुमठा नाका
४४) युनिक इंग्लिश मीडियम स्कूल
कॉलेज ऑफ फार्मसी कॅम्पस, जुले सोलापूर
४५) सौ. बी. एम. पुली कन्या प्रशाला
साखर पेठ
४६) बी. एफ. दमानी प्रशाला
बुधवार पेठ
४७) एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल
केगाव, उत्तर सोलापूर



