सोलापूर

चंद्रपूरच्या CAFO विरोधात सोलापूर झेडपीतील लेखा कर्मचारी आक्रमक; काळ्या फिती लावून कामकाज सुरू

मिलिंद कांबळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद; कर्मचाऱ्यांकडून निषेध आंदोलन

चंद्रपूरच्या CAFO विरोधात सोलापूर झेडपीतील लेखा कर्मचारी आक्रमक; काळ्या फिती लावून कामकाज सुरू

मिलिंद कांबळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद; कर्मचाऱ्यांकडून निषेध आंदोलन

सोलापूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (CAFO) अतुल गायकवाड यांच्या कार्यशैलीविरोधात महाराष्ट्र राज्य लेखा कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या निषेधाला सोलापूर जिल्हा परिषदेतील लेखा कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष मिलिंद दादा कांबळे यांच्या आवाहनानुसार सोलापूर जिल्हा परिषदेतील सर्व लेखा कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले.

चंद्रपूर जिल्हा परिषदेत CAFO यांच्या कार्यपद्धतीबाबत कर्मचारी वर्गाकडून विविध तक्रारी करण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्य संघटनेने निषेध नोंदविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोलापूर जिल्हा परिषदेतील लेखा कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपला निषेध व्यक्त केला.

काळ्या फिती लावून नियमित कामकाज सुरू ठेवत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनाच्या माध्यमातून संबंधित प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्य संघटनेच्या आवाहनानुसार करण्यात आलेल्या या निषेध आंदोलनामुळे सोलापूर जिल्हा परिषदेतील लेखा विभागात कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचे चित्र पाहायला मिळाले. पुढील काळात प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते, याकडे कर्मचारी वर्गाचे लक्ष लागले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!