सोलापूर

श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात गणेशोत्सवांतर्गत विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित स्पर्धांचे पारितोषिक वितरण संपन्न

श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात गणेशोत्सवांतर्गत विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित स्पर्धांचे पारितोषिक वितरण संपन्न

सोलापूर : इंदिरा ज्ञानवर्धिनी, सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर येथे गणेशोत्सव २०२६-२७ अंतर्गत विद्यार्थी व पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ शाळेत उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका सौ. शिल्पाताई ठोकळ होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी संचालक मा. श्री. दिनकर पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सचिन (भैय्या) ठोकळ, इंटीरिअर डिजाइनर सौ. नेहा गांधी, उद्योजिका सौ. प्रार्थना बिज्जरगी, तसेच संस्थेचे सचिव श्री. भिकाजी गाजरे व प्राचार्य श्री. डी. डी. गाजरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी संचालिका सौ. शिल्पाताई ठोकळ यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांचा स्वागत व सत्कार केल्यानंतर गणेशोत्सवांतर्गत विद्यार्थी व माता-पालकांसाठी आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच विजेत्या महिला पालकांना पैठणी साडी, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.पाकला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून क्लाऊड किचनच्या ओनर सौ नेहा कुलकर्णी,इंडियन स्कॉलर्स स्कूलच्या समन्वयक कु सई धिमधिमे,वर्षा आर्टच्या संचालिका तसेच प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक नाट्य कलावंत सौ वर्षा मुसळे यांनी मेहंदी व रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले तर पाककला परीक्षक म्हणून सौ श्रुती मोहोळकर बालनाट्य दिग्दर्शक यांनी उत्कृष्टरित्या परीक्षण केले.

यावेळी बोलताना सौ. नेहा गांधी व सौ. प्रार्थना बिज्जरगी यांनी शाळेने पालकांसाठी आयोजित केलेल्या विविधांगी व नावीन्यपूर्ण स्पर्धांचे कौतुक केले.

प्रमुख पाहुणे मा. श्री. दिनकर पाटील यांनी शाळेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करून, पालकांनी विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे मत व्यक्त केले. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सचिन (भैय्या) ठोकळ यांनी विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धांचे तसेच सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.

अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या संचालिका सौ. शिल्पाताई ठोकळ यांनी गणेशोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये पालकांनी घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. तसेच कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या पालकांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य श्री. डी. डी. गाजरे यांचे मार्गदर्शन लाभले. गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. अनिल फराडे, उपाध्यक्ष श्री. अतुल बुनगे, सचिव श्री. रोहित होटकर, मिरवणूक प्रमुख श्री. आनंद ढगे, खजिनदार श्री. अमोल घनाते, प्रसिद्धी प्रमुख श्री. युसूफ शेख, सर्व सदस्य तसेच शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अश्विनी जाधव व सौ. श्रुती मोहोळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. वैशाली पवार यांनी केले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!