सोलापूर

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत हगलूर ग्रामपंचायतीची सीईओ कुलदीप जंगम यांनी केली पाहणी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत हगलूर ग्रामपंचायतीची सीईओ कुलदीप जंगम यांनी केली पाहणी

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे हगलूर ग्रामपंचायतीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत झालेल्या तसेच सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यात ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येत असलेल्या विकास योजना, मूलभूत सुविधा, कामांची सद्यस्थिती तसेच निधीचा उपयोग याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामपंचायतीने आतापर्यंत पूर्ण केलेली कामे समाधानकारक असल्याचे मत व्यक्त करत उर्वरित प्रलंबित कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

यावेळी ग्रामस्थ, महिला बचतगट सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या अडचणी, समस्या व विकासात्मक मागण्या मांडल्या असता, त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास साधणे, ग्रामपंचायती अधिक सक्षम करणे व नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, हा शासनाचा उद्देश असून, हगलूर ग्रामपंचायतीने या दिशेने सकारात्मक पावले उचलावीत, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

या दौऱ्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर कामांना अधिक गती मिळणार असून, ग्रामस्थांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!