महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी व उपजिल्हाधिकारी शिवकुमार यांना मातृशोक
कमलाबाई विरूपाक्षअप्पा स्वामी यांचे निधन, आज सायंकाळी लातूर येथे अंत्यसंस्कार

महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी व उपजिल्हाधिकारी शिवकुमार यांना मातृशोक
कमलाबाई विरूपाक्षअप्पा स्वामी यांचे निधन, आज सायंकाळी लातूर येथे अंत्यसंस्कार
सोलापूर (प्रतिनिधी) :- महाबीजचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यावर मातृशोक कोसळला आहे. त्यांच्या मातोश्री श्रीमती कमलाबाई विरूपाक्षअप्पा स्वामी यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच प्रशासकीय, सामाजिक व विविध क्षेत्रांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

श्रीमती कमलाबाई स्वामी या उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या देखील मातोश्री होत. स्वामी कुटुंबीयांवर आलेल्या या दुःखद प्रसंगामुळे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध स्तरांतील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
त्यांच्या पार्थिवावर आज दि. २८/५/२६ रोजी सायंकाळी ५ वाजता लातूर येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यविधीसाठी कुटुंबीय, नातेवाईक, प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली.
श्रीमती कमलाबाई स्वामी यांच्या निधनाने स्वामी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.



