महाराष्ट्र

सार्वत्रिक बदली प्रक्रियेत खोटी माहिती; जिल्हा परिषदमधील 9 शिक्षक निलंबित

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) :— सार्वत्रिक बदली प्रक्रियेत तथ्यहीन आणि चुकीची माहिती भरल्याच्या आरोपावरून जिल्हा परिषदेने मोठी कारवाई करत नऊ शिक्षकांना तत्काळ निलंबित केले आहे. ही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी मंगळवारी केली.या निर्णयामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून, जिल्हाभर या घटनेची चर्चा सुरू आहे.

जिल्हा परिषदेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे ८,५०० शिक्षक कार्यरत आहेत. या वर्षी शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या. प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी शिक्षकांना त्यांच्या सेवाविषयक आणि नियुक्तीसंबंधित माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश दिले होते.
मात्र तपासात आढळले की काही शिक्षकांनी,
शाळांमधील अंतर चुकीचे दर्शवले

रुजू होण्याची तारीख खोटी भरली

विषयांमध्ये परस्पर बदल दाखविले

सेवाकाल वाढवून दाखविला

या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करून अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला.

ग्रामविकास विभागाच्या १८ जून २०२४ च्या आदेशानुसार, बदली प्रक्रियेत चुकीची किंवा खोटी माहिती दिल्यास थेट निलंबनाची कारवाई करावी असा नियम आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण यांनी पुष्टी केली.

निलंबित 9 शिक्षकांत विविध तालुक्यांतील शिक्षकांचा समावेश असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे,
रवींद्र धर्मा जाधव
भाग्यशाली भास्कर जगताप
जयश्री मारोती कस्तुरे
अलमास फातेमा हसन खान
सुरेखा काशिनाथ वाघ
अंजली नारायण महाजन
आयेशा सुलताना खान
निसार फातेमा जुबेर अहमद
कविता सुरेश अंबुसे

या कारवाईनंतर शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, काही शिक्षक संघटनांकडून लवकरच निवेदन किंवा निषेध नोंदवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिक्षण विभागाकडून असे संकेत मिळत आहेत की,
अशाच प्रकारे चुकीची माहिती भरलेल्या इतर शिक्षकांच्याही प्रकरणांची तपासणी सुरू आहे
पुढील दिवसांत अधिक नावे समोर येण्याची शक्यता

“ऑनलाईन बदली प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती,” असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!